Wednesday, November 12, 2025

५१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर !अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ रस्त्याचे काम लवकर पूर्ण होणार

अहील्यानगर -शेवगाव बाह्यवळण रस्त्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली करण्याचे, तसेच कुंभमेळाच्या पुर्वी अहील्यानगर ते सावळीविहीर रस्ताच्या काम पूर्ण करण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साविळीविहीर ते अहील्यानगर मार्गाचे काम निर्धारीत वेळेत पुर्ण करा.मार्गाचे महत्व लक्षात घेवून कामामध्ये कोणतीही तडजोड न करता दर्जेदार कामास प्राधान्य देण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

अहील्यानगर जिल्ह्यातील शेवगाव बाह्यवळण रस्ता तसेच सावळीविहीर ते अहील्यानगर रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विधान भवनात जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला सार्वजनीक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये प्रामुख्याने शेवगाव बाह्यवळण रस्ताच्या कामाच्या तयार करण्यात आलेल्या आराखड्याची माहीती अधिकार्यांनी बैठकीत सादर केली.रस्ताच्या कामासाठी करावे लागणारे भूसंपादन आणि यासाठी निधी उपलब्धतेचा आढावाही घेण्यात आला.

यापुर्वी या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी डॉ सुजय विखे पाटील आणि आ.मोनिका राजळे यांच्या पाठपुराव्यामुळे झालेल्या बैठकामध्ये या मार्गाच्या कामाचा आरखडा निश्चित करण्यात आला होता.शहरातून मराठवाड्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी २२.६०२ कि.मी.लांबीचा या रस्ते प्रकल्पासाठी ५६.१९१ हेक्टर इतकी जमीन संपादीत करावी लागणार असून यासाठी ८०कोटी रूपयांच्या निधीचा प्रस्ताव अर्थसंकल्पातील तरतूदीसाठी सादर करण्यात आला आल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

मात्र सदरचा मार्ग दोन विभागांना जोडणारा असल्याने काम करताना मार्ग चौपदरी कसा होईल हा दृष्टीकोन ठेवून कामाचे नियोजन करावे आशा सूचना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी बैठकीत दिल्या.

अहील्यानगर ते सावळीविहीर या रस्ताच्या कामाची निविदा प्रक्रीया पूर्ण होवून कामाच्या सूचनाही निर्गमित झाल्या आहेत सुमारे ५१५ कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर असून कुंभमेळाच्या दृष्टीने या रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिल्या.कामाच्या गुणवतेत कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles