सलग चार आठवड्यांच्या वाढीनंतर, या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण होत आहे.मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचाही सोन्याच्या दरांवर परिणाम झाला आहे. सलग चार आठवड्यांच्या तेजीनंतर, या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण होत आहे. ही घसरण जागतिक बाजारपेठ आणि देशांतर्गत वायदे बाजार या दोन्ही ठिकाणी दिसून आली. सामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा, लग्नसराईच्या मोसमात सोन्याचे दागिन, चांदीची भांडी किंवा अजून काही वस्तू करता यावी असं प्रत्येकाचचं स्वप्न असतं. पण गेल्या काही काळात या दोन्ही धातूंनी जी उत्तुंग झेप घेतली होती, त्याने सामान्य माणसाच्या डोळ्यातलं (खरेदीचं) स्वप्न हे स्वप्नच राहणार की काय अशी शंका येत होती. पण सोन्याचे-चांदीचे दर जसे वर चढतात तसे खालीही येतात, गेले काही दिवस हाच ट्रेंड सुरू होता. मात्र अशातच आज २५ एप्रिल २०२६ रोजी, शनिवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २५ एप्रिल २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५४,०५० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,४१,२१० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
Gold-Price: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ ; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर
- Advertisement -


