अरविंद केजरीवाल यांच्या आम आमदी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आपच्या राज्यसभेच्या 10 पैकी 7 खासदारांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यानं मोठी खळबळ उडाली. खासदार राघव चढ्ढा , अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी काल (24 एप्रिल) पत्रकार परिषद घेत पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्यासोबतच हरभजन सिंग,विक्रम सहानी, स्वाती मालीवाल,राजेंद्र गुप्ताही आपला रामराम ठोकणार असल्याचं चढ्ढा यांनी जाहीर केलं. तसेच आपची साथ सोडतानाच राज्यसभेत आम आदमी पक्षाचे भाजपात विलीनीकरण करण्यात आल्याचं राघव चढ्ढांनी सांगितलंय. राघव चढ्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेशही केला आहे.
आता आपच्या भाजपात विलीनीकरणावर महत्वाची माहिती समोर आली आहे. आपच्या राज्यसभेत विलीनीकरणाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे खासदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. राज्यसभा सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलीनीकरणाशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. आप खासदारांच्या पत्रात सात सदस्यांची यादी आहे, हे पत्र भाजपकडे प्राप्त झाले आहे आणि त्याची औपचारिकपणे दखल घेण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया राज्यसभा अध्यक्षांनी देखील मंजूर केली आहे.दहाव्या अनुसूचीच्या तरतुदींनुसार, विलीनीकरणासाठी दोन-तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. सध्याच्या प्रकरणात ही अट पूर्ण झाली आहे, त्यामुळे अपात्रतेचा प्रश्न उद्भवत नाही.
राघव चड्ढा
संदीप पाठक
राजेंद्र गुप्ता
विक्रम साहनी
स्वाती मालीवाल
हरभजन सिंग
अशोक मित्त


