अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर २ मे, दिवशी सोन्याच्या दरांमध्ये हालचाल पाहायला मिळाली. सलग काही दिवस घसरण झाल्यानंतर आताही सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. आज शनिवार २ मे २०२६ रोजी देशांतर्गत बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज किमतींमध्ये कोणतीही मोठी वाढ किंवा घट झालेली नाही. अमेरिका-इराणमधील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहेत. गुंतवणुकीसाठी किंवा दागिन्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत जाण्यापूर्वी आजचे दर तपासून घेणे आवश्यक आहे
चांदीबाबतही असाच ट्रेंड दिसून येतो. तीन दिवस स्थिर राहिल्यानंतर आता सलग तिसऱ्या दिवशी चांदीचे दर खाली आले आहेत.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज शनिवार २ मे २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५१,५३० तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,३८,९०३ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २,५०,७२० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,५०७ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
Gold-Price: सोन्याच्या किमतीत एका दिवसातच मोठा फेरबदल; झपाट्याने बदलले दर, ; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर
- Advertisement -


