सोने आणि चांदीच्या दरात गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने वाढ होताना दिसून आली. ही वाढ किरकोळ नव्हती तर प्रत्येकवेळी दर नव्या उच्चांकावर पोहोचत होता. त्यामुळे सर्वसामान्यांना दागिने खरेदी करण्यासाठी खिसा रिकामा करावा लागत आहे. अशातच आता आखाती देशातील युद्धाची झळ आता जगासह भरताला देखील बसत असल्याचे समोर आलं आहे. परिणामी पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. याचदरम्यान, नरेंद्र मोदींच्या या आवाहनानंतर केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सोने आणि चांदीच्या आयातशुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. सोने,चांदीवरील आयातशुल्क ६% वरुन १५% वर करण्यात आली आहे. असे असतानाच याचा परिणाम आता सराफा बाजारावर होताना दिसत असून सोने चांदी दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १७ मे २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १५८,८२० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १४५,५८५ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. तर एक किलो चांदीचा भाव २७१,२५० एवढा आहे.


