Gold-Price: पेट्रोल वाढलं, सोन्याचे काय झालं? जाणून घ्या १० ग्रॅमचा दर….

आठवड्यात दुसऱ्यांदा सोन्याच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. सोन्याच्या किंमतीबरोबरच दूध, पाव अन् इतर वस्तूंच्या किंमतीही झपाट्याने वाढत आहेत. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीमध्येही वाढ नोंदवण्यात आली. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ८२० रूपयांनी वाढली आहे. २४ कॅरेट सोनं प्रति तोळा १,५७,१९० रूपयांवर पोहचले आहेत. मुंबई, पुणे, जळगाव ते दिल्ली अन् कोलकाता या प्रत्येक शहरात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ नोंदण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. पण सोमवार आणि मंगळवारी सोन्याच्या दरात अचानक वाढ झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले थांबवल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आणि त्यामुळे अमेरिकन डॉलर कमकुवत झाला. त्यामुळे मंगळवारी (१९ मे) सकाळी एमसीएक्सवर सोन्याच्या दरात वाढ झाली. देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याच्या दरात वाढ झाली.

२४ कॅरेट सोन्याचे दर

१ ग्राम: १५,७१९ (८२ रुपयांची वाढ)

८ ग्राम: १,२५,७५२ (६५६ रुपयांची वाढ)

१० ग्राम: १,५७,१९० (८२० रुपयांची वाढ)

१० तोळे : १५,७१,९०० (८,२०० रुपयांची वाढ)

२२ कॅरेट सोन्याचे दर

१ ग्राम: १५,७१९ (७५ रुपयांची वाढ)

८ ग्राम: १,२५,७५२ (६०० रुपयांची वाढ)

१० ग्राम: १,५७,१९० (७५० रुपयांची वाढ)

१० तोळे (१०० ग्राम): ₹१५,७१,९०० (७,५०० रुपयांची वाढ)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles