सलग दोन दिवसांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. आजदेखील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईत सोन्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे. आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे जवळपास ५०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याआधी आजचे दर वाचा.रोज सोन्याचे नवीन दर अपडेट केले जातात. इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम सोन्याच्या दरावर होताना दिसत आहे. जागतिक पातळीवरील युद्धामुळे सोन्याचे दर वाढत आहे जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर.आज २४ कॅरेट सोन्याचे दर ४९० रुपयांनी महागले आहेत. याची किंमत १,५९,९३० रुपये झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ३९२ रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२७,९४४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४,९०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १५,९९,३०० रुपये झाले आहेत.
आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४५० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १,४६,६०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३६० रुपयांनी वाढले असून हे दर १,१७,२८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४,५०० रुपयांनी वाढले असून हे दर १४,६६,००० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर १ तोळ्यामागे ३७० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१९,९५० रुपये झाले आहे. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २९६ रुपयांनी वाढले असून हे दर ९५,९६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ३,७०० रुपयांनी वाढले असून हे दर ११,९९,५०० रुपये झाले आहेत.


