अहिल्या नगर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे तीन जिल्हाध्यक्ष ; यांना मिळाली संधी…

नगर: काँग्रेस पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आता तीन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत. पक्षाने ‘संघटन सृजन अभियान’तर्गत पक्ष संघटनेत फेरबदल करण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही. नगर जिल्ह्यात तीन जिल्हाध्यक्ष नियुक्त करताना दोघांची पुनर्नियुक्ती झाली आहे तर तिसऱ्या अध्यक्षाची नवीन नियुक्ती झाली आहे.
काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी दीप चव्हाण, उत्तर जिल्हाध्यक्षपदी सचिन गुजर (श्रीरामपूर) व दक्षिण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील (कर्जत ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस वेणुगोपाल यांनी या निवडी जाहीर केल्या. दीप चव्हाण यापूर्वी शहर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होतेच तर सचिन गुजर यांच्याकडे जिल्हाध्यक्ष म्हणून पूर्ण जिल्ह्याचे प्रभारी पद होते. आता ग्रामीणसाठी दोन स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. किरण पाटील पूर्वी कर्जत तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. नियुक्त करण्यात आलेले तिघेही माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक आहेत.कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या पक्ष संघटनेत बदल घडवण्यासाठी ‘संघटन सृजन अभियान’ जाहीर केले होते. त्यावेळी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले पक्ष निरीक्षक तथा ओडिशाचे माजीमंत्री शंकर राऊट यांनी संघटनेला नवीन चेहरा देण्यासाठी फेरबदल करण्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात तसे घडलेले नाही. किरण पाटील वगळता दीप चव्हाण व सचिन गुजर यांची फेरनियुक्ती झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles