सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज १३ जून २०२६ रोजी, शनिवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १३ जून २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५०,८९० तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,३८,३१६ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २,४७,६१० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,४७६ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,३८,०६८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १,५०,६२० रुपये आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,३८,०६८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १,५०,६२० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,३८,०६८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा १,५०,६२० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,३८,०६८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा १,५०,६२० रुपये आहे.


