देशांतर्गत शेअर बाजारातील विक्रमी तेजी आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. जागतिक पातळीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी घटल्याने गेल्या तीन दिवसांत २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम (तोळा) तब्बल २००० रुपयांनी घसरले आहेत. तर दुसरीकडे, चांदीच्या भावातही मोठी घसरण झाली असून चांदी पहिल्यांदाच अडीच लाखांच्या खाली घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.इंडियन बुलियन वेबसाईटनुसार, आज (१८ जून २०२६) ११७० रुपयांची घसरण झाल्यानंतर २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव १,५३,०१० रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर आला आहे. गेल्या काही काळापासून सोन्याने १.६० लाखांचा ऐतिहासिक टप्पा पार केला होता. मात्र, नफावसुलीमुळे सोन्याच्या किमतीत ही तात्पुरती घसरण पाहायला मिळत असल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असे असले तरी आठवडाभरात सोन्याच्या किमती २.३२ टक्क्यांनी वधारल्या आहेत.
सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीही घसरल्या आहेत. आज (गुरुवार १८ जून) चांदीचे भाव प्रति किलोमागे तब्बल ४९२० रुपयांनी कोसळले. चांदी सध्या २,४८,२५० रुपये प्रतिकिलो झाली आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे चांदीचा दर प्रति किलो २,६४,९०० रुपयांवर आला आहे. देशातील प्रमुख महानगरांचा विचार केला तर चेन्नईमध्ये चांदीचे दर सर्वात महाग असून, तिथे ग्राहकांना एक किलो चांदीसाठी २,७४,९०० रुपये मोजावे लागत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्षभर सोने खरेदी थांबवण्याचे आवाहन आणि केंद्र सरकारची आयात शुल्कात १५ टक्क्यांपर्यंत वाढ करुनही भारतात सोन्याची मागणी कमी झालेली नाही. उलट मे २०२६ या एकाच महिन्यात भारताची सोन्याची आयात वार्षिक आधारावर तब्बल ३४ टक्क्यांनी वाढून ३.४१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीतून ही धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. दुसरीकडे मे २०२५ मध्ये चांदीची आयात ५.६६ कोटी डॉलर होती. ती यंदा मोठ्या प्रमाणात घसरली.थे ग्राहकांना एक किलो चांदीसाठी २,७४,९०० रुपये मोजावे लागत आहेत.


