Gold-Price: सोन्याचे दर पुन्हा बदलले ;जाणून घ्या १० ग्रॅमचा दर…

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पण पुन्हा एकदा आखाती देशात युद्धाचे ढग गडद झाल्यानंतर सोन्याच्या मागणीत वाढ झाली अन् दरही वाढले. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे देशातील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ७६० रूपयांनी वाढले आहे. तर २२ कॅरेटचे सोनं प्रति तोळा ७०० रूपयांनी महागले आहे. मुंबई, पुण्यापासून ते दिल्ली कोलकाता अन् राजस्थानपर्यंत सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.

भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांतील चढ-उतारानंतर सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ झाल्याने खरेदीदारांच्या खिशाला फटका बसणार आहे. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट अशा तिन्ही प्रकारच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.२४ कॅरेट सोन्याच्या दरात आज प्रति ग्रॅम ७६ रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १४,४२२ रुपये झाला आहे. तर १० ग्रॅम (एक तोळा) सोन्याची किंमत १,४४,२२० रुपये (७६० रुपयांची वाढ) इतकी पोहोचली आहे. तसेच १०० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना १४,४२,२०० रुपये मोजावे लागत आहेत.दागिने बनवण्यासाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम ७० रुपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम १३,२२० रुपयांवर पोहोचले आहे. तर प्रति तोळा ७०० रूपयांची वाढ झाल्याने खरेदीसाठी १,३२,२०० रुपये मोजावे लागणार आहेत.

त्याचप्रमाणे १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम ५७ रुपयांची वाढ झाली असून, १ ग्रॅमचा भाव १०,८१६ रुपये झाला आहे. १० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याचा दर १,०८,१६० रुपये (५७० रुपयांची वाढ) झाला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles