अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे पुन्हा एकदा युद्धसदृश परिस्थितीची भीती निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम सोन्याच्या दरावर स्पष्टपणे दिसून येत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. अक्षय्य तृतीया सणापूर्वी सराफ आणि स्टॉकिस्टांनी केलेल्या नवीन खरेदीमुळे बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झाली. सोन्याच्या किमती गेल्या एका महिन्याच्या उच्चांकावरून किंचित वाढल्या आहेत. पाकिस्तानमध्ये राजनैतिक तोडगा निघण्याची शक्यता बाजारपेठ तपासत असल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव स्थिर होत आहेत. देशांतर्गत बाजारात, एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात हळूहळू सुधारणा दिसून आली आहे. आज १६ एप्रिल २०२६ रोजी गुरुवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १६ एप्रिल २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५५,३६० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १४२,४१० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
Gold-Price: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत मोठा बदल; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर
- Advertisement -


