विधानपरिषद निवडणूक…. कॉंग्रेसकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव चर्चेत

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत संख्याबळ पाहता महाविकास आघाडीला एकच जागा मिळणार आहे. यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेस मध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीकडीतील काही बड्या नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत.

काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत, हनमंत पवार, राजेश राठोड यांची नावं विधानपरिषदेसाठी चर्चेत आली आहेत . त्यामुळे आता महाविकास आघाडीला मिळणारी एक जागा नेमकी कोणत्या पक्षाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विधान परिषद उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील. तर महाविकास आघाडीमध्ये कुठले प्रकारची चर्चा न करता इतर दोन पक्षांकडून उद्धव ठाकरेंच्या नावाला पाठिंबा दिला जाईल. अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यासोबतच काँग्रेस पक्षाकडून मांडण्यात आली आहे. मात्र यामध्ये उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक नसतील, तर मग ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्यासाठी राज्यसभेप्रमाणे अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles