Gold-Price: सोन्याच्या दरात घसरण ; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर झालेल्या तुफान खरेदीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून रॉकेटच्या वेगाने धावणाऱ्या सोन्या-चांदीच्या किमतींना सोमवारी (२० एप्रिल) ब्रेक लागला आहे. पश्चिम आशियात पुन्हा एकदा तणाव वाढल्याने जागतिक बाजारपेठेत अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने गुंतवणूकदारांनी नफावसुली केली. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव १.२१ टक्क्यांनी घसरून ४,८२१ डॉलर प्रति औंस (१,४४,५०० रुपये) वर आले आहेत.

सोमवार, आठवड्याचा पहिल्या दिवशी, सोने-चांदीच्या दरात अक्षय्य तृतीयेच्या तुलनेत किंमतीत किरकोळ बदल दिसून आला असून खरेदी करण्यापूर्वी आजचे अपडेटेड रेट्स जाणून घेणे ग्राहकांसाठी महत्त्वाचे आहे.अक्षय्य तृतीयेनंतर देशांतर्गत सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरांमध्ये उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या दिवसाआधी सोन्या-चांदीच्या किंमती स्थिर राहिलेल्या ज्यामुळे खरेदीदारांसाठी दिलासा मिळालेला.आजही सोने चांदीच्या भावाने अपेक्षापेक्षा जास्त भरारी घेतली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २० एप्रिल २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १५५,७७० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १४२,७९० रुपये आहे, आणि 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,16,830 रुपये आहे. अशाप्रकारे, गेल्या काही दिवसांतील सोने-चांदीच्या दरांमधील घट आता भरून निघाल्याचा दिसत आहे, जे गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बाब आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles