राहुरीत दिवसाढवळ्या थरार: राहुरीत नातवाने झाडली आजोबांच्या छातीत गोळी, प्रकृती चिंताजनक

अहिल्यानगर-राहुरी तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे कौटुंबीक वादातून एका नातवाने आपल्याच ६५ वर्षीय सख्ख्या चुलत आजोबांवर दिवसाढवळ्या गोळीबार केला आहे. या जीवघेण्या हल्ल्यात दगडू कोहकडे (वय ६५) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राहुरी परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी प्रवीण कोहकडे आणि त्याचे चुलत आजोबा दगडू कोहकडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर आधी हाणामारीत झाले होते, तर काही दिवसांपूर्वी संतापलेल्या आरोपीने गाड्या पेटवून दिल्याचाही प्रकार घडला होता. या दोन्ही घटनांसंदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात आधीच गुन्हे दाखल आहेत

हाच जुना राग मनात धरून आरोपी प्रवीण कोहकडे याने शुक्रवारी दगडू कोहकडे यांना गाठून त्यांच्यावर थेट बंदुकीतून गोळी झाडली. आरोपीने केलेल्या गोळीबारात एक गोळी दगडू कोहकडे यांच्या थेट छातीत घुसली. गोळी लागताच ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या दगडू कोहकडे यांना स्थानिकांनी तत्काळ उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles