अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युइटी, निवृत्तीवेतन निर्णयाची अंमलबजावणी लवकरच

मुंबई: राज्यात दोन लाखांवर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असून त्यांना पावणे दोन लाखांपर्यंत सेवा उपदान (ग्रज्युइटी) तसेच निवृत्तीवेतन देण्याबाबतचा निर्णय २०२४ला सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला. राज्य सरकारच्या पातळीवर त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. मात्र सरकारी पातळीवर याबाबत विचारविनिमय सुरू असून या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होण्याची शक्यता आहे.
सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमाह निवृत्तीवेतन व उपदान देण्याबाबतचा प्रस्ताव वित्तविभागाकडे सादर करण्यात आला आहे. त्यावर शासनस्तरावर विचारविनिमय सुरू असून त्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नसल्याबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदनतीस यांच्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अतिरिक्त काम करून घेऊनही मानधन न दिल्याबाबतच्या अंगणवाडी सेविकांच्या तक्रारी असल्याची बाब आमदार राजेश राडोड, सत्यजित तांबे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मांडली.
यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या उत्तरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठी प्राधिकृत करण्यात अलेल्या अंगणवाडी सेविका/अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी भरलेल्या अर्जांपैकी पात्र लाभार्थ्यांच्या नोंदीनुसार प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी आयुक्त, महिला व बालविकास पुणे यांना निधी वितरीत करण्यात आला असून त्यानुसार पोत्साहन भत्ता अदा करण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी व निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतच्या प्रस्तावावर विचारविनिमय सुरू असल्याचेही त्यांनी सुरू असल्याचे नमूद करताना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधनाव्यतिरिक्त कामाच्या आधारावर प्रतिमाह अनुक्रमे २००० रुपये व १०००रुपये प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात येत असून पोषण अभियानांतर्गतदेखील अंगणवाडी सेविकांस ५०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles