नगर – कल्याण रोडवर भीषण अपघात, वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

अहिल्यानगर – नगर कल्याण महामार्गावर पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसरात साईनगरी हॉटेलजवळ ३१ मे रोजी पहाटे १.३० च्या सुमारास भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. संदीपकुमार गोविंद धुमाळ (वय ४२, रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) असे मयताचे नाव आहे.

याबाबत मयताचे भाऊ संजय कुमार गोविंद धुमाळ (वय ४७, रा. टाकळी ढोकेश्वर, हल्ली रा. पाईपलाईनरोड, अहिल्यानगर) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत संदीपकुमार धुमाळ हे ३१ मे रोजी पहाटे १.३० च्या सुमारास स्वतःची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. एमएच-१२ एसएस-८५८४) घेऊन जात होते. याच दरम्यान, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हलगर्जीपणे चालवून संदीपकुमार यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात संदीपकुमार गंभीर जखमी झाले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात घडवून आणल्यानंतर संबंधित अज्ञात वाहन चालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला.

या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(ए)(बी), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस अज्ञात

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles