केंद्र सरकारचा मध्यरात्री मोठा निर्णय: सोने-चांदी झाले आणखी महाग; आयात शुल्कात मोठी वाढ

परकीय चलनावरील ताण आणि आयात बिल कमी करण्यासाठी सोन्याची खरेदी काही दिवस टाळा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने बुधवारी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवून १५ टक्के केले आहे. याआधी आयातशुल्क ६ टक्के होते.
भारत हा सोन्याची आयात करणारा जगातील दुसऱ्या क्रमाकांचा देश आहे. आयातशुल्कात वाढ केल्यामुळे भारतातील सोन्याची मागणी कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यातून भारताची व्यापार तूट नियंत्रणात आणण्यास आणि रुपयाला आधार देण्यात यामुळे मदत होऊ शकते.
तथापि आयात शुल्क वाढीमुळे सोन्याची तस्करी पुन्हा वाढू शकते, अशी चिंता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण ९५.७५ च्या निच्चांकी पातळीवर झाली आहे. ही घसरण रोखणे, मौल्यवान धातूंची आयात रोखणे आणि व्यापारी तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारने १० टक्के मूलभूत सीमा शुल्कासह ५ टक्के कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर लागू केला आहे. यामुळे एकूण आयातशुल्क १५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सोने आणि चांदीची खरेदी काही दिवस टाळण्याचे आवाहन केल्यानंतर यावरील आयातशुल्क वाढवले जाणार का? अशी एक चर्चा सुरू झाली होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला रॉयटर्सने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने बातमी देताना म्हटले होते की, सरकारचा आयातशुल्क वाढविण्याचा कोणताही विचार नाही. मात्र त्यानंतर हा निर्णय घेतल्याचे आता समोर आले आहे.

https://x.com/DDNewslive/status/2054373058639470706/photo/1

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles