राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे सातारा, सांगली, गडचिरोली, कोल्हापूर, जळगाव यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनात मोठे बदल होणार आहेत. या बदल्यांमध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदस्थापना बदलण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या आदेशानुसार तुषार दोशी यांची सातारा येथून सांगली येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर निखिल पिंगळे यांची पुणे येथील पोलीस उपआयुक्त पदावरून सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप घुगे यांना सांगलीवरून मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपआयुक्त (सुरक्षा) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून तुषार दोषी चांगलेच चर्चेत आले होते. शिवसेनेने त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. आता मात्र त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे :
१. निखिल पिंगळे : पोलिस उपायुक्त, पुणे ते पोलिस अधीक्षक, सातारा.
२. राजकुमार शिंदे : पोलिस उपायुक्त, पुणे ते पोलिस अधीक्षक, वाशीम.
३. महेश्वर रेड्डी : पोलिस अधीक्षक, जळगाव ते पोलिस अधीक्षक, सीआयडी पुणे.
४. तुषार दोशी : पोलिस अधीक्षक, सातारा ते पोलिस अधीक्षक, सांगली.
५. संदीप घुगे : पोलिस अधीक्षक, सांगली ते पोलिस उपायुक्त (सुरक्षा), राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई.
६. योगेश गुप्ता : पोलिस अधीक्षक, कोल्हापूर ते पोलिस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र.
७. नीलोत्पल : पोलिस अधीक्षक, गडचिरोली ते पोलिस अधीक्षक, कोल्हापूर.
८. एम. रमेश : अतिरिक्त पोलिस अधीक्षक, गडचिरोली ते पोलिस अधीक्षक, गडचिरोल.
९. श्रीकांत धिवरे : पोलिस अधीक्षक, धुळे ते पोलिस अधीक्षक, जळगाव.


