शासकीय काम करण्यासाठी शेतकऱ्याकडे २५ हजाराची लाच मागणाऱ्या विस्तार गटविकास अधिकाऱ्याला अटक करण्यात आलीय.अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.जळगाव जिल्ह्यातील जामोद तालुक्यातील शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
संदीप मोरे असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. संदीप मोरे यांची कामाची माणूस म्हणून अशी ओळख आहे. सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेणारे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी असल्याची त्यांची ख्याती आहे. संदीप मोरे यांना बुलढाण्यात अनेक समाजभूषण पुरस्कार मिळालेत.त्याचे नाव लाच घेण्याच्या प्रकरणात आल्यानं खळबळ उडाली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार विस्तार गटविकास अधिकारी संदीप मोरेयांनी शेतकऱ्याकडून शासकीय काम करून घेण्यासाठी २५ हजारांची लाच मागितली होती. याप्रकरणी जामोद तालुक्यातील शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जळगाव जामोदमध्ये ही कारवाई केली.बुलढाणा जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागातील एका संरक्षण अधिकाऱ्याला लाच मागितल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तक्रारदाराच्या दिव्यांग मुलीला क्रांतीज्योती बालसंगोपन योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला होता. या लाभाची रक्कम मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्याने लाच मागितली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून अधिकाऱ्याला अटक केली. जळगाव जामोद येथील तालुका शेतकरी खरेदी-विक्री सहकारी समिती कार्यालयासमोर कारवाई करण्यात आली.


