लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर! खात्यात जमा झाले थेट…3000 रुपयांबाबत मोठी अपडेट!

राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आथिक मदत केली जाते. जून महिना संपलेला असला तरीही या महिन्याचे पैसे अद्याप महिलांच्या बँक खात्यात पाठवण्यात आले नव्हते. परंतु आता याच लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर मिळाली आहे. लाडक्या बहिणींचे बँक खाते आता पैशांनी भरले आहेरा ज्य सरकारकडून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर 1500 रुपये पाठवले जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे पैसे लवकरच बँक खात्यात जमा होतील, असे सांगितले जात होते. म्हणूनच लाभार्थी लाडक्या बहिणी रोज आपले बँक खाते तपासत होते. आता मात्र याच लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर मिळाली आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून 1500 रुपये पाठवले जात आहेत. लाडक्या बहिणींनी आपापले बँक खाते तपासावे असे आवाहन केले जात आहे.

जून महिना संपला तरीही लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळाले नव्हते. आता अर्धा जुलै महिना संपलेला आहे. तरीदेखील महिला पैशाची वाट पाहात होत्या. त्यामुळे सरकार दोन्ही महिन्याचे एकूण 3000 रुपये एकदाच बँक खात्यावर टाकणार का? असे विचारले जात होते. परंतु याचे उत्तर आता नाही असे मिळाले आहे. सध्यातरी महिलांना फक्त जून महिन्याचे पैसे दिले जात आहेत. जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार, याबाबत सध्यातरी अनिश्चितता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles