श्रीरामपूर -तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रक्कम, मोबाईल फोन, वाहने व जुगाराचे साहित्य असा सुमारे 4 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निपाणी वडगाव शिवारात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करून संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. छाप्यादरम्यान जुगार खेळणार्या तसेच जुगार अड्डा चालविणार्या 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन, वाहने आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 4 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर धंद्यांविरोधात यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.


