महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांची रणधुमाळी, निवडणूक कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचे पडघम वाजले. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, देवळा आणि पेठ नगरपंचायतीसाठी २० जूनला पोट निवडणूक पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकीच्या तयारीची बैठक घेतली. २३ जुलैला काय निकाल येतो? त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतला जाईल. २३ जुलैच्या निकालावर जिल्हा परिषद निवडणुकीचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘२०२५ मध्ये नगर पंचायत निवडणुका झाल्या. ज्या ठिकाणी सदस्य नॉमिनेशननंतर निधन झाले किंवा अन्य काही कारणास्तव पद रिक्त झाले. राज्यात अशा २९ पदांसाठी पोट निवडणूक आहे. मनमाडमधील २, पेठ मधील १ आणि देवळामधील १ अशा ४ जागांसाठी पोट निवडणुका आहे.

दिनेश वाघमारे यांनी पोटनिवडणुकीच्या तयारीबाबत सांगितले की, ‘पोलिंग २० तारखेला होणार आहे. मतदार यादी १ जुलैची वापरणार आहोत. मतमोजणी केंद्रांची तयारी झाली आहे. कर्मचारी वर्ग, मतदान यंत्र व्यवस्थित आहेत. निवडणुकीची जय्यत तयारी झालेली आहे. या पोट निवडणुकीत लोकसभा, विधानसभाप्रमाणेच तीच प्रक्रिया असणार आहे. मतदार यादीत ४ गट केले जातील. पहिल्या नंबरला राज्य मान्यता प्राप्त पक्षांचे चिन्ह असणार आहे. तर शेवटी अपक्षांचे चिन्ह असेल.’

तसंच, ‘जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे रखडल्या होत्या. २३ जुलै रोजी निकाल काय येतो त्यानंतर निर्णय होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एसआयआ नंतर घ्यावा, अशी काही मागणी आमच्याकडे आलेली नाही. एसआयआर प्रक्रिया जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे नाही. मॅपिंगची प्रक्रिया सुरू आहे.’, असे दिनेश वाघमारे म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles