‘महाराष्ट्र केसरी’ पैलवान सिकंदर शेखच्या थार गाडीचा अपघात

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख याच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कवठेमंकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी जवळ त्याच्या ‘थार’गाडीचा अपघात झाला. रत्नागिरी नागपूर हायवे वर विठ्ठलवाडी येथे कारने साईड डिव्हायडरला धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र अपघातावेळी गाडीत सिकंदर शेख होता की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या भीषण अपघातात कोणी जखमी झालं आहे की नाही अद्याप समजू शकलेलं नाहीये. हायवे पोलीसांकडून या अपघातासंदर्भात अधिक तपास करण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार,आज सकाळी साडेसहाच्या सुमारा रत्नागिरी-नागपूर महामार्गावर सिकंदर शेख याच्या थार गाडीचा अपघात झाला. कवठेमंकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी जवळ कार अपघातग्रस्त झाली. कार चालवणाऱ्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हाँ अपघात झाल्याचे समजते. नियंत्रण सुटल्याने थार कार ही साईड डिव्हायडरला धडकली. मात्र गाडी वेगात असल्याने ही जोरदार धडक बसली की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला.थारच्या अपघाताची घटना घडली तेव्हा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख किंवा अन्य कोणी व्यक्ती कारमध्ये होती की नाही, कोणी जखमी झाले आहे की नाही याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. जखमींबद्दल काही कळू शकेलं नाहीये. अपघाताची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती मुळतचा ते अपघातस्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles