उन्हाळ्या सुट्ट्या संपत आल्या असून आता शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाकडून शाळा सुरू होण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र आता शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. दरम्यान १५ जूनपासून राज्यातील इतर जिल्ह्यात शाळा सुरू होणार आहेत. तर विदर्भातील २२ जूनपासून सुरू होणार होत्या. मात्र आता यावेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. शिक्षण संचालक यांनी काढलेले पत्र केले रद्द करण्यात आले आहे.
विदर्भातील शाळा १५ जूनऐवजी सोमवारी २२ जून रोजी सुरू करण्यात याव्यात असा आधी आदेश देण्यात आला होता. विदर्भातील शाळा २२ जून ते ३० जूनपर्यंत सकाळच्या सत्रात सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र आता हा निर्णय बदलण्यात आला आहे. शिक्षण संचालक यांनी आधीच्या आदेश पत्र काढले होते, ते आता रद्द करण्यात आले आहे.
शाळाच्या निर्णयाबाबत नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर निर्णय देताना नागपूर खंडपीठाने महत्वाचा निर्णय दिला असून २२ तारखेपासून सुरू होणाऱ्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलेत. उन्हामुळे विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरु करण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय.
आजच्या सुनावणीत शिक्षण संचालक यांनी काल रात्री काढलेल्या पत्रावर नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढले, तसेच २२ जूनला शाळा सुरू करण्याचा निर्णय चुकीचा असल्याची टिप्पणी केली. नागपूर खंडपीठ आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना अशा पद्धतीचा आदेश शिक्षण संचालकांनी का काढला असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून एक वाक्यता म्हणून एका दिवशी सगळ्या शाळा सुरू करण्याचा भूमिका सरकारी वकील आणि मांडली असता एक त्यात आणायचे आहे तर ते १५ जूनच का एक जुलै का नाही असा सवाल ही उपस्थित करत एक वाक्य वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे सिंचन शिक्षण संचालक यांनी काढलेले दोन्ही पत्र रद्द करत ३० जून पासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. या निर्णयामुळे जवळपास २०००० शाळेतील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


