Friday, November 14, 2025

‘या’ आठ मंत्र्यांची विकेट पडणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक मोठा राजकीय ‘धक्कातंत्र’ राबवण्याच्या तयारीत

राज्यातील राजकारण पुन्हा एकदा जोरदार घडामोडींच्या वळणावर असल्याचा दावा करत सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांची ‘विकेट’ लवकरच पडणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर काही नेते व मंत्री आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत, तर काहींवर कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांना बाजूला करून नाराज असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना संधी दिली जाईल, असाही दावा करण्यात आला आहे. 100 दिवसांच्या कार्यक्रमातही यांची समाधानकारक नसल्याची दावा करण्यात आला आहे. सामनाने ‘हिटलिस्ट’वर असलेल्या मंत्र्यांची नावे स्पष्टपणे दिली आहेत. यामध्ये माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, योगेश कदम, नरहरी झिरवळ, नितेश राणे, जयकुमार गोरे, भरत गोगावले आणि दादा भुसे यांचा समावेश आहे. या मंत्र्यांविषयी झालेल्या वादग्रस्त घटनांमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सामना दैनिकाने असा दावाही केला आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक मोठा राजकीय ‘धक्कातंत्र’ राबवण्याच्या तयारीत असून, मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्ष करण्याची चर्चा आहे, तर सध्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रीपद दिले जाऊ शकते, अशीही अटकळ वर्तवण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles