अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दरोड्यातील आरोपीसह साथीदार ताब्यात

दरोडा व इतर 11 गुन्ह्यासह मोक्का गुन्ह्यात फरार असलेला आरोपी साथीदारसह स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
आरोपींकडून अकोले येथील दरोड्यासह 10 गुन्हे उघड

अहिल्यानगर : प्रतिनिधी दिनांक 16/05/2026 रोजी पहाटे 03.00 वा. च्या सुमारास औरंगपूर ता. अकोले येथील फिर्यादी श्री अशोक केरु वाळुंज यांच्या घरात 4 अनोळखी इसमांनी प्रवेश करून फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओढून नेले. तसेच कपाटातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी अकोले पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.309/2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 309(4) प्रमाणे गुन्हा दाखल होता.

मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनानुसार पो.नि. श्री. संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि कृष्णकुमार सेदवाड व पथकाला सदर गुन्ह्याचा छडा लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीच्या आधारे माहिती काढली असता, दिनांक 14/07/2026 रोजी सदर गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी अजय सादीश काळे रा. वाळुंज याने साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले. तो वाळकी ता.जि. अहिल्यानगर येथे येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याला व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले.

ताब्यातील आरोपी :
1. अजय सादीश काळे वय-24 वर्षे, रा. वाळुंज ता.जि. अहिल्यानगर
2. अक्षय उर्फ सोन्या अर्पन भोसले वय-26 वर्षे, रा. घानेगाव ता. पारनेर जि. अहिल्यानगर

चौकशीत त्यांनी सदर गुन्हा गणेश सुरेश भोसले, तुकाराम सुरेश भोसले, बाळू झारू भोसले, आशिष ठुब्या भोसले, शरद कैलास काळे, निकेश सादीश काळे, धीरज सादीश काळे या साथीदारांसह केल्याची कबुली दिली. तसेच चोरीचे दागिने किरण भाऊसाहेब बेंद्रे रा. वाळुंज यास विकल्याचे सांगितले.

आरोपींचा गुन्हेगारी रेकॉर्ड :
अजय काळे हा दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरीसह मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी आहे. त्याच्यावर सुपा, पारनेर, भिंगार कॅम्प, एमआयडीसी, चाकण येथे 10 गुन्हे दाखल आहेत.
अक्षय भोसले याच्यावर देखील पारनेर व चाकण येथे 4 गुन्हे दाखल आहेत.

उघडकीस आले 10 गुन्हे :
अकोले – 2, अहिल्यानगर तालुका – 1, पारनेर – 2, आश्वी – 1, राहाता – 1, लोणी – 2, घारगाव – 1 असे जिल्ह्यातील एकूण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत.

ताब्यातील 2 आरोपींना पुढील तपासकामी अकोले पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles