अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधात उगारलेला कारवाईचा बडगा चर्चेचा विषय ठरतोय. एफडीएच्या धाडीचा अनेकांना धास्ती लागली आहे. अन्न पदार्थात भेसळ केलेली आढळून आली तर थेट मकोका लावण्याचे आदेश तुकाराम मुंढेंनी दिलेत. मुंढेंच्या धडक मोहिमेचे संपूर्ण राज्यात कौतुक होत आहे. मात्र पूर्वानुभव लक्षात घेता तुकाराम मुंढेंच्या बदलीची लगोलग च चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.
सरकारनं तुकाराम मुंढे याच्या बदलीचे धंदे बंद करावे त्यांना याच विभागात राहू द्या भेसळ करणाऱ्यांना नीट करतील. मुंढे यांची बदली करण्याच्या भानगडीत पडल्यास मी सरकारच्या मागे लागेल असं जरांगे पाटील म्हणालेत. आमदार रोहित पवार पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत आहेत. हे. त्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.
सरकारनं तुकाराम मुंढे याच्या बदलीचे धंदे बंद करावे त्यांना याच विभागात राहू द्या भेसळ करणाऱ्यांना नीट करतील. मुंढे यांची बदली करण्याच्या भानगडीत पडल्यास मी सरकारच्या मागे लागेल असं जरांगे पाटील म्हणालेत. आमदार रोहित पवार पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत आहेत. ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची त्यांच्या सेवेतील अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त म्हणून २५ वी बदली झाली. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. राजकारणी आणि व्हीआयपी लॉबीला न जुमानता त्यांनी बेधडक कारवाई करत भेसळखोरांचे कंबरडे मोडत आहेत. त्याच दरम्यान मुंढे यांच्या बदलीची चर्चा होत आहे, त्यावरून मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला उघड इशारा दिला. तुकाराम मुंढे हे खूप चांगलं काम करत आहेत. अन्नपदार्थांमधील भेसळ रोखल्यामुळे थेट सामान्य जनतेच्या आरोग्याला फायदा होणार आहे. तसेच दुधातील भेसळ थांबल्याने शेतकऱ्यांच्या शुद्ध दुधाला चांगला भाव मिळेल. त्यामुळे सरकारनं मुंढे यांच्या बदलीच्या भानगडीत अजिबात पडू नये, अन्यथा आम्ही सरकारच्या मागे लागू, असं जरांगे म्हणाले.क्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला उघड इशारा दिला.


