विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मोठ्या राजकीय घडमोडी घडल्या. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चार आमदारांपैकी तीन आमदारांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला हजर लावली होती. नुसती हजेरी नाही तर त्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपला पाठिंबा देखील दिला. आता या आमदारावर कारवाई होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तसेच संकेत माध्यमांशी बोलताना दिलेत. बंडखोर आमदारांबाबत निवडणुकीनंतर पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे. सोलापूरमध्ये महायुतीचे राजेंद्र राऊत विरुद्ध महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होतेय. येथील निवडणूक बिनिवरोध करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरेंनी प्रयत्न केले. मात्र, खासादर धैर्यशील मोहिते पाटलांच्या पुढाकाराने ही निवडणूक लागली आहे.
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत ही जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली होती. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाला होता. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होता. त्यासाठी वसंतराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुढाकार घेतला. आपल्याकडे 600 अदृश्य मतं असल्याचा दावाही त्यांनी निवडणूक प्रचाराच्या काळात केला.
मात्र धैर्यशील मोहिते पाटील एकाकी पडलेत. कारण, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील तीन आमदारांनी भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिलाय. येथील निवडणुकीसाठी माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर देखील इच्छुक होते. पण त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती,त्यामुळे उत्तम जानकर नाराज होते. दुसरे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी पंचायत समिती निवडणुकीची नाराजी बोलून दाखवली.
वसंतराव देशमुख यांनी पंचायत समितीवेळी भाजपला मदत केल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, पक्षात असणारे मतभेद बाहेर बोलणे किंवा दुसऱ्या पक्षात जाऊन मदतीबाबत आश्वासन देणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणालेत. विधानपरिषद निवडणुकीत आता पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या आमदारांना पक्षाच्या उमेदवारासोबत राहण्याच्या सूचना देण्यात आली आहे. मात्र, कारवाईबाबत आपण अद्याप काही बोलणार नसून निवडणुकीनंतर पवार साहेब आणि सुप्रिया ताई यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय होईल, असेही शशिकांत शिंदे म्हणालेत.


