बीडमध्ये पुन्हा एकदा संतापजनक घटना घडली आहे. कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीने एकाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना विवाहित महिलेवर अत्याचाराची घटना घडली. महिलेवर अत्याचारानंतर गावच्या चावडीत बांधून ठेवलं आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. तर आरोपीला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर तिला गावामध्ये आणून गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवले गेले. हा प्रकार सकाळी समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी या विवाहितेची सुटका केली. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी वैभव पटेकर याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पिंपळनेर पोलिसांसह पिंक पथकाकडून तपास केला जातोय. परंतु या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


