Friday, March 6, 2026

आपल्या घरात कुत्राही वाघ, ठाकरे बंधूंची दाऊदसोबत तुलना, भाजप खासदाराने डिवचलं

मुंबईतील मीरा रोड परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. संबंधित व्यापारी मराठीत बोलला नाही, म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सात कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल केला आहे. मात्र, या प्रकरणानंतर भाजपा आणि मनसेच्या नेत्यांमध्ये जोरादार आरोप-प्रत्यारोप करत वाद रंगल्याचं पाहायला मिळालं. यातच ठाकरे बंधूंनी घेतलेल्या मेळाव्यात बोलताना देखील राज ठाकरे यांनी या संदर्भात भाष्य केलं होतं.

तसेच मराठीच्या नावाखाली कोणी गुंडगिरी केली तर सहन केलं जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला दिला होता. दरम्यान, मराठी भाषा न बोलणाऱ्या परप्रांतीयांना मनसेकडून मारहाणीच्या घटनेनंतर आता भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी प्रतिक्रिया देत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तसेच दुबे यांनी परप्रांतीयांवरून ठाकरे बंधूंना एक प्रकारे आव्हान देत डिवचलं आहे. निशिकांत दुबे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये कुत्रा असा शब्द संबोधल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.त्याशिवाय दुबे यांनी ठाकरे बंधूंची तुला दाऊत आणि मसूद अजहर यांच्यासोबत केली आहे.

“हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा”, असं निशिकांत दुबे यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी एक्स (ट्विटर) या सोशल माध्यमावर पोस्ट केली आहे. तसेच या पोस्टमध्ये निशिकांत दुबे यांनी ही पोस्ट राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाला टॅग केलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles