लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता वेळेवर पैसे मिळत नसल्याने लाडक्या बहिणींनीच योजना बंद करण्याची मागणी केली आहे. लाडकी बहीण योजनेत पैसे येण्यास नेहमीच उशीर होतो. त्याच पार्श्वभूमीवर महिलांनी ही मागणी केली आहे.
लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून जुलै ते डिसेंबर २०२४ पर्यंत दर महिन्याला वेळेवर पैसे जमा झाले. परंतु त्यानंतर पैसे येण्यास नेहमी उशीर झाला आहे. गेल्या ६ महिन्यांपासून एकाही महिन्यात लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे मिळाले नाहीत. जून महिन्याचा लाभ अजूनही महिलांच्या खात्यात जमा झाल नाही. त्यामुळे महिलांनी ही मागणी केली आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी झाली आहे. १० लाखांहून अधिक महिलांचा लाभ बंद झाला आहे. याच पार्श्वभूर्मीवर सोलापूर जिल्ह्यातील ५३ महिलांनी ही मागणी केली आहे. आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतो, आमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करावे, अशी मागणी योजनेच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे.
अनेक महिन्यांपासून वेळेवर लाभ नाही
जवळपास गेल्या ६ महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा वेळेवर लाभ मिळत नाहीये. अनेक महिलांचे या योजनेच्या पैशातून काही महत्त्वाची कामे अवलंबून असतात. परंतु योजनेचा लाभ खूप उशिरा मिळत असल्याने अनेक कामे रखडली जातात. यामुळेच महिलांनी योजना बंद करण्याची मागणी केली आहे.


