शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे 9 पैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. गेल्या आठवड्यात रविवारीच उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी केवळ चारच खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. तर पाच खासदार हे ऑनलाईन हजर असल्याचा दावा करण्यात येत होता. तेव्हापासूनच राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये या सर्व खासदारांनी बंडखोरी केली आहे. दरम्यान खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर समर्थक, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकरां विरोधात आपला संताप व्यक्त केला. त्यांनी ‘गद्दार’ असे लिहून निषेध नोंदवला.आजच्या डिजिटल युगात, सोशल मीडियावरील फॉलोअर्स हे नेत्याच्या लोकप्रियतेचे एक महत्त्वाचे मापदंड मानले जाते. दरम्यान, आकडेवारीवरून असे दिसून येते की, ठाकरेंशी बंडखोरी केल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर नुकसान सोसावे लागले आहे. वृत्तानुसार, 24 तासांच्या आत त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोअर्सची संख्या जवळपास 20 हजारांनी कमी झाली. तज्ज्ञांच्या मते, तरुण पिढी, विशेषतः तरुण पिढी (Gen Z) या विरोधाच्या आघाडीवर आहे. आता आकडेवारी पाहता ओमराजे निंबाळकर परिस्थिती कशी हाताळतात आणि ते आपली प्रतिमा पुन्हा निर्माण करू शकतात की नाही, हे पाहणे बाकी आहे.धाराशिव समाज माध्यमात लोकप्रिय असणाऱ्या खासदार ओमराजे निंबाळकर यांची लोकप्रियता घटायला सुरवात झाली आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकरींनी ओमराजे निंबाळकर यांना केले अनफॉलो केले आहे. फेसबुकला 6 हजार लोकांनी अनफॉलो केले.
तर इन्स्टाग्रामवर 20 हजाराहून अनफॉलो केले आहे. ठाकरे गट सोडून शिंदे शिवसेनेत जाणार या चर्चेने समाज मध्यमावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
ठाकरेंशी साथ सोडली, एका रात्रीत 20 हजार लोकांनी सोडली साथ; मतदारसंघात पाऊल ठेवण्याआधीच ओमराजेंना झटका
- Advertisement -


