सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या निवडीला आक्षेप घेत चक्क त्यांनाच नोटीस बजावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाल्याचं दिसून येत आहे. एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काहीही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवडीला आक्षेप घेत नोटीस बजावली होती. या नोटीसवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही प्रतिक्रिया देत, नोटीसमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं.

नोटीसीत तथ्य नाही, राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी लावलेली बैठक नियमानुसारच होती. आम्ही तरीही यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ, माहिती घेऊ आणि नंतरच कारवाई करू , असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाचे सरचिटणीस सच्चिदानंद यांनी पाठवलेल्या नोटीसबाबत स्पष्टीकरण दिले. माझा संबंधित व्यक्तीसोबत संवाद नाही, दिल्लीत कोणाचा झाला असेल तर माहिती नाही. पण, कायदेशीर वैधता तपासावी लागेल, मला वैयक्तिगत वाटत नाही, यात काही तथ्य आहे. एकत्रित बसून राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झालेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघपणे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय, असेही तटकरेंनी स्पष्ट केले. लोकशाही मार्गाने आम्ही काम करतोय, कोणी कोणाबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, यंदा वाढदिवसाला अजित दादा नाहीत हे सहन होत नाही, दादांच्या जयंतीनिमित्ताने सप्ताहात विविध कामं, उपक्रम करू, अशी माहिती देखील सुनिल तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेलं अर्थखातं सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. यासंदर्भाने सुनिल तटकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, गेले काही दिवस अधिवेशन चालू होतं. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांची वेळ घेत आम्ही लवकरच हा प्रश्न मार्गी लावू, असेही सुनिल तटकरे यांनी म्हटले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles