NEET पेपर फुटी प्रकरण ;लातूरच्या RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकरला अटक

शभरात खळबळ उडवून दिलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासातात सीबीआयने धाडसत्र मोहिम राबवत महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर, लातूर जिल्ह्यातून अनेकांना ताब्यात घेतलं आहे. त्यामध्ये, याप्रकरणात लातूर कनेक्शन अधिक गडद होत असून, सीबीआयने शहरातील हालचाली पुन्हा वाढवल्या आहेत. आरसीसी या खासगी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी त्यांची तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर, काल त्यांच्या ट्युशनमध्ये सीबीआयचे पथक दाखल झाले होते. या कारवाईदरम्यान अनेक कागदपत्रे, संगणक आणि मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले होते. आज सकाळी पुण्यातील सीबीआय कार्यालयात त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अटक करण्यात आली आहे.

लातूर येथील ट्युशन एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल दुपारपासून सीबीआयच्या पथकाने लातूरमध्ये विविध ठिकाणी कारवाई करत महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना ताब्यात घेतल्यानंतर ही कारवाई अधिक महत्त्वाची मानली जात आहे. शुक्रवारी पहाटेपासून सीबीआयचे अधिकारी शिवराज मोटेगावकर यांच्या सुतमील परिसरातील निवासस्थानी दाखल झाले होते. घरातील कागदपत्रे, विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदी तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर पथकाने उद्योग भवन परिसरातील आरसीसीच्या कार्यालयात जाऊनही विविध माहिती आणि नोंदी गोळा केल्याची माहिती समोर आली होतीसीबीआयचे पथक आज पुन्हाआरसीसीच्या कार्यालयात तपास करत असून, या संपूर्ण कारवाईबाबत मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात येत आहे. लातूर पोलिसांचा बंदोबस्त तसेच सीबीआयचे अधिकारी या तपासात सहभागी असल्याची माहिती आहे. या प्रकरणात सीबीआयकडून सलग चौकशी आणि छापेमारी सुरू असून, आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची चर्चा आहे. मात्र, या कारवाईत नेमके काय हाती लागले, पुढील कारवाई काय होणार किंवा कोणावर गुन्हा दाखल होणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. NEET पेपरफुटी प्रकरणातील लातूर कनेक्शन समोर आल्यानंतर सीबीआयने तपासाची व्याप्ती वाढवली असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, लातूरमध्ये विविध ट्युशन क्लासेसच्या बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासबाहेरही पोलिस बंदोबस्त आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles