छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे जरांगेंच्या झुंडीला घाबरले, ओबीसी नेत्याचा गंभीर आरोप…

ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली. लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, सरकार लाचार होताना पाहिले, माकडाप्रमाणे उड्या मारताना विखे पाटील पाहिले. विखे घराण्याची इभ्रत पायधुळी मिळवली. केलेले पाप धुण्यासाठी प्रसाद लाड जरांगेंकडे आले. चंद्रकांत गायकवाड, प्रसाद लाड यांनी लाखो तरुणांचा रोजगार हिरावून घेतला. प्रसाद लाड यांची क्रिस्टल कंपनी या मधून सर्वच विभागात काम करतात. प्रसाद लाड कमिशन एजंट आहेत. जरांगेचे आंदोलन हे स्क्रिप्ट होतं. ठरवून एकदिवसाचे होते. यात मंत्री देखील सहभागी होते. थेट मंत्र्यांवरच लक्ष्मण हाके यांनी आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली. लक्ष्मण हाके यांनी पुढे म्हटले की, सरकार अस्थिर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्यासाठी होते. महाराष्ट्रातील मंत्री जरांगेला का भेटतात हे समजत नाही.

असंविधानिक मागण्या मान्य केल्या जातात. जरांगेचा अहंकार कुरवाळत आहे. मनोज जरांगे आणि सहकाऱ्यांनी चर्चेला बसावं. आज आंदोलन आम्ही सुरू करणार होतो. आंदोलनाची भाषा सरकारला कळते. मनोज जरांगे हे रिल स्टार आहेत. बिहार चित्रपटातील रिल स्टार आहेत. यादरम्यान लक्ष्मण हाके यांची जिभ घसरली, त्यांनी थेट प्रसाद लाड यांना हमखोर भाड खाऊ प्रसाद लाड म्हटले.लक्ष्मण हाके यांनी पुढे म्हटले की, ओबीसी मंत्री आणि नेत्यांना शुभेछा. मतदानातून लोक याला उत्तर देतील. मनोज जरांगे ला राजकारणाचे वेध लागले आहेत. प्रसाद लाडच्या मदतीने पक्ष स्थापन करून विजय थालपती व्हायचंय. पंकजा मुंडे, भुजबळ हे जरांगेच्या झुंडीला घाबरले आहेत, असाही मोठा आरोप त्यांनी केला. मनोज जरांगेचे आंदोलन एक दिवसाची एकांकिका होती. गेल्या दोन वर्षात भाजपचा डी एन ए राहिला नाही. ओबीसी भाजप पासून दूर होतोय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles