सोमवारी व मंगळवारी अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाचा ‘येलो अलर्ट’

अहिल्यानगर-राज्यात यंदा मान्सूनचा पाऊस लांबणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अद्याप सर्वदूर मान्सूनपूर्व पाऊसाची हजेरी नसली तरी 1 जूनपासून उन्हाच्या चटक्यामुळे परेशान असणार्‍या नगरकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने जिल्ह्याला सोमवार 1 व मंगळवार 2 जून रोजी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जाहीर केला आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील 4 दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तर अंतर्गत कर्नाटक यासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज दिला आहे. तसेच अंदमान आणि निकोबार बेटे, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, ईशान्य भारत, जम्मू-काश्मीर, लडाख, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली या भागांत मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवला आहे.

हवामान विभागाने यंदा राज्यात पावसाळ्याचे आगमन उशिरा होण्याची शक्यता वर्तवली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. परिणामी वाढत्या तापमानामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाने मान्सून पूर्व पावसाचा अंदाज जाहीर केला असून जिल्ह्यात दमदार मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यास त्याचा खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीला फाय

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles