मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; अहिल्यानगरमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा

संगमनेर: मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंर्दभात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीका केल्या प्रकरणी शहर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे शहराध्यक्ष पायल ताजणे शहरातील पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होत्या. याच दरम्यान एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावरील एका ग्रुपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सुरु असलेल्या टिकेची माहिती फोनवरून कळविली. ताजणे यांनी तात्काळ त्या पोस्टचे स्क्रीनशॉट मिळवून खात्री केली.

राजकीय द्वेषातून एका जबाबदार राष्ट्रीय नेत्याची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. ‌‘जागो संगमनेरी..‌’ नावाच्या ग्रुपचा ॲडमिन अमोल शेलकर आणि पोस्ट प्रसिद्ध करणारा अशा दोघांविरुद्ध संगमनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles