मराठा समाजाच्या मागणीवर मंत्री पंकजा मुंडे यांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाल्या, मी दर तासांनी जिल्हाधिकाऱ्यांशी

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे मागील 6 दिवसांपासून उपोषण करत आहेत. उपोषणामुळे जरांगे यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाऊन आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मी दर तासांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत आहे. शेवटी या गोष्टीला संविधानाच्या चौकटीत कसा न्याय देता येईल, याबाबत सरकार सकारात्मक आहे. तर दोन्ही समाजाच्या मुंबईत होणाऱ्या आंदोलनावर मुंडेंनी बोलणे टाळले. गणेशोत्सवात दोन्ही समाजाचे मुंबईत आंदोलन होण्याची शक्यता आहे. यावर त्यांनी म्हटलं की, याबाबत माध्यमांनी चिंता केल्याचे त्यांना सांगेल’.

भारताच्या जीडीपीत सुधारणा झाल्याने पंतप्रधान मोदींनी नागरिकांचं अभिनंदन केलं. त्यानंतर आज शरद पवारांनी जीडीपीवरून पंतप्रधान मोदींना टोला लगावला. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मला असं वाटतं की , शरद पवारांचं वक्तव्य मी ऐकलं नाही. मी निश्चित अभिमानाने सांगू इच्छित आहे की, आपला देश एका वेगळ्या प्रवासाला निघाला आहे. तो सकारात्मक प्रवास आहे. गेल्या 10 वर्षांतील चांगला विकास आहे. डोळ्यांनी विकास दिसत आहे. फक्त कागदावर दिसत नाही. अनेक राष्ट्रीय महामार्ग होत आहेत. राष्ट्रीय महामार्गांचं जाळं विनलं जात आहे. नाशिकला यायला देखील वंदे भारत आहे. प्रत्येक ठिकाणी भोगदे तयार केले जात आहे. वेगाने कामे होत आहेत. तिर्थक्षेत्रांचा विकास होत आहे. मुद्रा योजना राबवली जात आहे. आता नवीन पिढी कशी आनंदीत राहील, यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles