Ahilyanagar crime :अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणारा आरोपी पोलिसांकडून जेरबंद..!

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झालेबाबत पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलीस स्टेशनला दिनांक 26/10/ 2025 रोजी गुरनं. 1157/2025 भारतीयांनी संहिता कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर अपहरित अल्पवयीन पीडित मुलीचा शोध घेऊन पीडितेचा जवाब नोंदवून सदर गुन्ह्यात पोक्सो अंतर्गत कलम वाढ करण्यात आली. पीडीतेस तिच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आले.

अल्पवयीन पीडितेचे अपहरण करून तिचेवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अजय विनायक बर्डे याचा शोध घेणे कामी पोनि. संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोउपनि. राजू जाधव, पोहेकॉ. राहुल यादव, सुरज गायकवाड, पोकॉ. गणेश लिपने, पोकॉ. सचिन ताजने यांच्या पथकाने गोपनीय बातमीदार व तांत्रिक तपासाद्वारे गुन्ह्यातील आरोपी अजय विनायक बर्डे राहणार मांजरी तालुका राहुरी यास श्रीरामपूर येथून पाठलाग करून ताब्यात घेऊन दिनांक 21 11 2025 रोजी अटक करून आरोपीस मा. जिल्हा विशेष सत्र न्यायालय अहिल्यानगर येथे हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस दिनांक 25/11/2025 रोजी पर्यंत चार दिवस पोलीस कस्टडी सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे शासकीय अभियोक्ता श्रीमती राऊत मॅडम यांनी बाजू मांडली. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. राजू जाधव लेखनिक गणेश लिपने हे करत आहेत.

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मुलींचा शोध घेऊन गेल्या वर्षभरात 94 मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मुलींनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याच्या भुलथापाला व मोहाला बळी पडू नये. शालेय विद्यार्थिनींना कोणी त्रास देत असल्यास पोलिसांशी संपर्क करावा विद्यार्थिनीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. असे पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात पोउपनि. राजू जाधव, पोहेकॉ. सुरज गायकवाड, पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ. गणेश लिपणे,पोकॉ. सचिन ताजने, मपोकॉ. वंदना पवार, अनिता गुरवे तसेच श्रीरामपूर सायबर सेलचे पो

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles