Friday, November 14, 2025

लाभांशाच्या मुद्द्यावरून पुरोगामी सहकार मंडळ आक्रमक ; माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर आंदोलन

लाभांशच्या मुद्द्यावरून पुरोगामी सहकार मंडळ आक्रमक ; माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर आंदोलन

अहिल्यानगर -सभासदांना लाभांश वाढवुन मिळावा , कर्जाची मर्यादा वाढावी, संस्थेच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाचे फोटो पुन्हा लावावेत या मागणीसाठी विरोधी पुरोगामी सहकार मंडळाने आज माध्यमिक शिक्षक सोसायटीसमोर आंदोलन करीत घोषणाबाजी केली.
माध्यमिक शिक्षक सोसायटीची सर्वसाधारण सभा दि. १३ जुलै रोजी होत असून सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक सहा कोटींच्या अनावश्यक तरतुदी करून निव्वळ नफा कमी राहील व लाभांश १० टक्के न देता फक्त सहा टक्के देऊन घाणेरडे राजकारण केलेले आहे. मागील संचालक मंडळाचा जरी कारभार असला तरी त्या तरतुदी मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आहेत. अहवालामध्ये मात्र तरतुदीच्या पानावर सत्ताधाऱ्यांची नावे न टाकता मागील संचालक मंडळाची नावे टाकलेली आहेत. हे सारासार सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आहे.

तसेच उत्तम जिंदगी ही जी नव्यानं केलेली तरतूद फारच गरजेची असेल तर पाच समान हप्त्यात करावी. संस्थेच्या सन २०१८ मध्ये अमृत महोत्सव झालेला होता त्या कार्यक्रमास देशाचे नेते शरद पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माजी आमदार सुधीर तांबे, आमदार विक्रम काळे, माजी आ. चंद्रशेखर घुले हे उपस्थित असलेले छायाचित्रे गेली सात वर्षांपासून संस्थेमध्ये व संस्थेच्या सर्व शाखांमध्ये लावलेले होते. ते छायाचित्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी काढून टाकलेले असून ते परत त्या ठिकाणी संस्थेमध्ये लावावे. कृतज्ञता निधी योजना बंद न करता पूर्वीप्रमाणे चालू ठेवावी. कर्ज मर्यादा वाढवावी व निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी संस्थेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले .
यावेळी शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे, वाल्मीकराव बोठे, काकासाहेब घुले,सूर्यकांत डावखर, उत्तमराव खुळे , दिलीप काटे, वैभव सांगळे,काकासाहेब पिंगळे, संजय भुसारी, संजय कोळसे, दादासाहेब चौभे ,जाकीर सय्यद, प्रकाश राजुळे, , मनिषा म्हस्के , श्रीमती एम.बी.एकशिंगे ,श्रीमती एस.पी. ढोकळे , सुनील भुजाडी, विनोद जुंदरे, विशाल कोळसे, आदिसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles