पुण्यात भोंदू बाबाचं किळसवाण कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; मांडीवर बसवलं अन्…

नाशिकमधील भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरण चर्चेत असतानाच आणखी एका भोंदू बाबाच्या किळसवाण्या कृत्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करून अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप पुण्यातील स्वप्नील लांडे याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली असून, श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या भोंदूगिरीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील लांडे स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणवून घेत असल्याचा आरोप आहे. एका अल्पवयीन मुलीला मांडीवर घेऊन तिच्या कानात मंत्र फुंकण्यात आला. तसेच, तुला कोणतीही अडचण आली तर माझ्याकडे ये, असे सांगून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. उपस्थित झाले आहेत.या घटनेनंतर पीडित मुलीचे समुपदेशन करण्यात आले आहे. या प्रकरणी बिबवेवाडी परिसरातील एका व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपी बिबवेवाडी येथे राहत असल्याचे सांगितले जात असून, सध्या तो फरार असल्याची माहिती आहे.

अंधश्रद्धा, भीती आणि चमत्कारांच्या नावाखाली नागरिकांचा विश्वास संपादन करून त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचा संशय या प्रकरणातून व्यक्त होत आहे. आरोपीकडून आणखी कोणाची फसवणूक किंवा शोषण झाले आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकरणातील प्रत्येक आरोपाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तपासातून नेमके कोणते तथ्य समोर येते आणि या प्रकरणाला पुढे कोणते वळण मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles