भिंगार हद्दीत तिरट जुगाराच्या अड्ड्यावर छापा ; 7 आरोपींकडून 1,67,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेकडून भिंगार पोलीस स्टेशन हद्दीत तिरट जुगाराच्या अड्ड्यावर छापा
7 आरोपींकडून 1,67,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर : प्रतिनिधी

मा. श्री. मुम्मका सुदर्शन साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई केली.

पो.नि. श्री. संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अरविंद भिंगारदिवे, सुनिल पवार, पंकज व्यवहारे, योगेश भिंगारदिवे, योगेश कर्डीले यांच्या पथकाला दिनांक 13/07/2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सोलापूर रोडलगत, कोंबडीवाला मळा, सारसनगर, हॉटेल आरवीच्या बाजूला चालू असलेल्या बांधकामाच्या आडोशाला काही इसम ‘तिरट’ नावाचा पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत आहेत.

पथकाने तात्काळ सदर ठिकाणी छापा टाकला असता बांधकामाच्या आडोशाला 7 इसम तिरट नावाचा हार-जीतीचा जुगार खेळताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारली असता त्यांनी खालील नावे सांगितली:

1. बाबासाहेब ज्ञानदेव बेरड वय-56 वर्षे, रा. दरेवाडी ता.जि. अहिल्यानगर
2. संजय प्रभाकर तडके वय-62 वर्षे, रा. कोठी स्टेशन रोड, अहिल्यानगर
3. भास्कर भानुदास जगधने वय-62 वर्षे, रा. कोंबडीवाला मळा, सोलापूर रोड, अहिल्यानगर
4. संजय रामा भिंगारदिवे वय-54 वर्षे, रा. दरेवाडी ता.जि. अहिल्यानगर
5. सुधीर डॅनियल शिंदे वय-55 वर्षे, रा. न्यू बेथेल कॉलनी, स्टेशनरोड, अहिल्यानगर
6. महादेव सदाशिव कराळे वय-46 वर्षे, रा. अगडगाव ता.जि. अहिल्यानगर
7. राजू भिवा मोरे वय-53 वर्षे, रा. आदर्शनगर वार्ड नं.01, श्रीरामपूर ता. श्रीरामपूर

पथकाने आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम 13,500 रुपये व 4 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन 1,54,000 रुपये किमतीचे असा एकूण 1,67,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ताब्यातील आरोपींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 375/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles