शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकारचा धडक निर्णय; ‘या’ धोकादायक तणनाशकावर देशात बंदी

शेतीमध्ये तण मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘पॅराक्वाट’ या धोकादायक तणनाशकावर भारतात पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भात आणि गव्हाच्या शेतातील तण नष्ट करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. पण, हे तणनाशक अतिप्रमाणात विषारी असून मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचे समोर आले होते. त्यानंतर केंद्र सरकारने यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहेजागतिक स्तरावर अनेक देशांनी यापूर्वीच ‘पॅराक्वाट’ (Paraquat) यावर बंदी घातली होती. भारतातही याच्या संपर्कात आल्यामुळे अनेक लोकांचा जीव गेल्याच्या आणि विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. वैद्यकीय तज्ज्ञ आणि पर्यावरणवाद्यांनी यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. अखेर सरकारने याच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर तीव्र आक्षेप घेत देशव्यापी बंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे बाजारातून हे औषध आता हद्दपार होणार आहे. शेतकऱ्यांना आता तण नियंत्रणासाठी इतर सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा लागणार आहे..

पॅराक्वाट या तणनाशकावर तात्काळ प्रभावाने संपूर्ण देशात बंदी घालण्याबाबतचा निर्णय, जीआर केंद्र सरकारकडून आज जारी करण्यात आला. अनेक विषशास्त्रज्ञ, डॉक्टर आणि कृषी तज्ज्ञांच्या मते ही बंदी याआधी लागू व्हायला हवी होती. पॅराक्वाटचा ज्या देशात शोध लागला आणि उत्पादन होते, त्या देशासह ७० हून अधिक देशांमध्ये त्यावर बंदी आहे. तरीही भारतीय शेतांवर त्याची कायदेशीररित्या फवारणी सुरूच होती. पण आता केंद्राकडून यावर देश लोकांच्या आरोग्यामुळे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कीटकनाशक कायदा, १९६८ च्या कलम २७ अंतर्गत पॅराक्वाट डायक्लोराइडच्या आयात, उत्पादन, विक्री, वाहतूक, वितरण आणि वापरावर बंदी घातली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने मंगळवारी पॅराक्वाटवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली, असे इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. मंत्रालयातील सूत्रांनी किसान तकचे संपादक ओम प्रकाश यांना सांगितले होते की, पॅराक्वाटवर देशव्यापी बंदी घालण्याचा प्रस्ताव असलेली एक फाईल कृषी मंत्रालयाला सादर करण्यात आली आहे. तिला या आठवड्यात मंजुरी मिळू शकते. या घटनेच्या काही दिवसांनंतर ही बातमी समोर आली आहे.भरात बंदी घालण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles