Saturday, January 24, 2026

केडगावच्या लिंकरोडवर जुगार अड्ड्यावर छापा 6 लाखांचा मुद्देमाल जप्त , 9 जणांवर गुन्हा

अहिल्यानगर-केडगाव परिसरात लिंकरोडवरील शेटे मळा येथे तिरट नावाच्या जुगार खेळावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुमारे 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जुलै रोजी हवालदार महेश पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शेटे मळा येथील निंबोळी झाडाखाली जुगार अड्ड्यावर छापा टाकला.यावेळी अक्षय गोरे, अमन शेख, मयुर गहिले, प्रतिक महारपुडे, ज्ञानेश्वर जाधव, गणेश शेळके, ज्ञानेश्वर मिसाळ, बाबासाहेब गायकवाड आणि प्रविण सातपुते हे इसम हारजितीचा जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून 6 लाख 7 हजार 490 रुपये रोख, 8 मोबाईल फोन, 1 अल्टो कार, तसेच 6 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, अंमलदार बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी, सलीम शेख, विनोद बोरगे, विक्रम वाघमारे, सुर्यकांत डाके, सत्यजीत शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, सोमनाथ केकाण, महेश पवार, शिरीष तरटे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, प्रतिभा नागरे, राहुल गुंड यांचे पथकाने केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles