‘ऑपरेशन टायगर’मध्ये शरद पवारांची एन्ट्री,उद्धव ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार मैदानात

ठाकरेंच्या खासदारांच्या या बैठकीआधी संजय राऊत आणि अरविंद सावंतयांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यात सुरु असलेल्या घडमोडींवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. आता जर कोणी बेईमानी करणार असेल तर त्याला सोडायचं नाही. त्यांच्या त्यांचा मतदारसंघात जाऊन राडे करायचे. शरद पवार तुमच्याबरोबर त्या भागात सभा घेण्यासाठी येतो म्हणाले. कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही, त्याला धडा शिकवायचा, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षसुद्धा असेल, अशी माहिती अरविंद सावंत आणि संजय राऊतांनी दिली. त्यामुळे आता ऑपरेशन टायगरमध्ये शरद पवारांची एन्ट्री झाल्याचं बोललं जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागले आहेत. या 6 खासदारांनी वेगळा गटही स्थापन केला आहे आणि तसं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती आहे. ऑपरेशन टायगर (फुलप्रूफ झालेले असून आता लगेच काहीही जाहीर करायचे नाही, कोणतेही पुरावे द्यायचे नाही असं शिंदे शिवसेनेकडून ठरवण्यात आल्याचं कळतंय. ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढील पावलं टाकली जातील. पुढील 2 दिवस तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणलं जाणार नाही, अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी माझाला दिली आहे. अतिशय काटेकोरपणे आणि नियोजन पद्धतीनं ऑपरेशन टायगर राबवलं गेल्याची माहिती हळूहळू समोर येत आहे. रात्रभरात दिल्लीत वायूवेगानं घडामोडी घडत गेल्या. दरम्यान खासदारांचा स्वतंत्र गट लवकरच शिवसेनेत विलीन करण्यात येणार असून शिंदेंचे 6 खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करुन आपली बाजू मांडतील, असं सांगण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles