शेवगाव एलसीबीची धडक कारवाई; बाईकवरून येऊन चोरी करणारी टोळी पकडली, 6.50 लाखांचा ऐवज हस्तगत

शेवगावात जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद; एलसीबीने 7 महिन्यांनी उकलले प्रकरण, 6.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर, शेवगाव येथे जबरी चोरी करणाऱ्या 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या आरोपींकडून 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लग्नाहून परताना गळ्यातील सोने लुटले
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 30/11/2025 रोजी सायंकाळी 6.00 च्या सुमारास फिर्यादी मिरसगाव येथील लग्न आटपून मुलगी सविता साईनाथ सुपारे रा. डोईफोडेवस्ती, शेवगाव हिच्या घरी चारचाकी गाडीने जात असताना वरूर चौक, शेवगाव येथे रस्ता क्रॉस करत असताना गाडीचा स्पीड कमी झाल्याने अचानक एका मोटार सायकलवर दोन इसम फिर्यादीच्या गाडीजवळ आले. मागील इसमाने फिर्यादी बसलेल्या साईडने गाडीच्या खिडकीतून हात घालून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व सोन्याचा राणीहार बळजबरीने तोडून चोरून नेले. सदर घटनेबाबत फिर्यादी रंजना दिलीप जेठे रा. सैनिक नगर सोसायटी, रायगड हॉस्पिटलजवळ, डिक्सळ ता. कर्जत जि. रायगड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 1019/2025 भा.न्या.सं. कलम 309(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तारकपूर बस स्टँडवर सापळा रचून अटक
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, फुरकान शेख, रमिझराजा आतार, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड, योगेश कर्डीले, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, चालक उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

पथकास तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा इसम नामे लखन विजय काळे याने त्याचे साथीदारासह केला असून तो तारकपूर बस स्टँड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ तेथे सापळा रचून थांबले असता दोन इसम संशयास्पदरित्या थांबल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन नाव गाव विचारले असता त्यांनी नावे सांगितली: 1) लखन विजय काळे वय 23, रा. ग्रामीण रुग्णालय, शेवगाव, 2) कानिफनाथ अंबादास झिपरे वय 39, रा. कोळगाव ता. शेवगाव.

ताब्यातील आरोपीकडे विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देऊन मुद्देमाल इसम नामे 3) भारत महादेव दहिवाळकर वय 51, रा. शेवगाव यांच्याकडे दिल्याचे सांगितले.

6.50 लाखांची सोन्याची लगड जप्त
आरोपींच्या कब्जातून 6,50,000 रु. किमतीची 50 ग्रॅम वजनाची एक सोन्याची लगड असा एकूण 6,50,000 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles