Shirdi साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय, ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शिक्षण व निवास व्यवस्था

राज्यातील शेतकरी आत्महत्येमुळं उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी साईबाबा संस्थान पुढे सरसावले आहे. आत्महत्येमुळं उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाती विद्यार्थ्यांना मोफत निवास आणि शिक्षणाची सुविधा दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, 10 वीमध्ये 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना 11 वी आणि 12 वीचे संपूर्ण शिक्षण मोफत दिले जाणार असल्याची माहिती श्रीसाईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली आहे.

आत्महत्येमुळं उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत निवास आणि शिक्षणाची सुविधा देण्याबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची असलेली CET ची फी देखील साईबाबा संस्थान भरणार आहे. भविष्यात NEET आणि JEE सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठीही मोफत मार्गदर्शन आणि सुविधा सुरू करण्याची तयारी संस्थानने केली आहे.

आरोग्याच्या बाबातीत देखील साईबाबा संस्थानच्या माध्यमातून रुग्णांना मोठ्या प्रमाणात मदत तसेच उपचार केले जातात. शिक्षणासाठी देखील गरजू विद्यार्थ्यांना साईबाबा संस्थानच्या माध्यमातून मदत केली जाते. श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी हे भारतातील एक प्रमुख आणि श्रीमंत देवस्थान आहे. जे साईबाबांच्या समाधी मंदिराचे व्यवस्थापन करते. ‘सबका मालिक एक’ ही शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो भाविक येथे येतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles