नको त्या नादाला लागला, मुख्याध्यापकाने आपलं संपूर्ण कुटुंब संपवलं, सोलापुरातील धक्कादायक घटना

सोलापूरच्या बार्शी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका मुख्याध्यापकाने आपल्या दोन मुलांची आणि पत्नीची हत्या केली. त्यानंतर स्वता:ने आत्महत्या केली आहे. मुख्याध्यापक योगेश पाटील, पत्नी माधुरी, मुले अथर्व आणि शिवांश अशी मृतांची नावे आहेत. बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात ही कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिसांना 22 पानांची सुसाईड नोट मिळाली आहे. या कर्जाच्या विवंचनेतूनच त्यांनी संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे . प्राथमिक माहितीनुसार, मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले होते. त्यात त्यांना मोठं नुकसान झालं होतं. शेअर्स मार्केटमुळे त्यांच्यावर तब्बल १ कोटी ८० लाख रुपयांचं कर्ज झालं होतं. त्याच कर्जापायी मुख्याध्यापक आणि त्यांच्या कुटुंबाने जीवन संपवल्याचा निर्णय घखेतल्या असावा असं म्हटलं जातंय

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles