राज्यात नवा विक्रम; अहिल्यानगर जिल्हा परिषदेत एकाचवेळी ८५ परिचारांची विक्रमी पदोन्नती

2025 च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेत परिचारांची विक्रमी पदोन्नती

परिचर संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सत्कार

अहिल्यानगर: जिल्हा परिषदेच्या परिचर संवर्गातून आरोग्य सेवक (पुरुष) या पदावर तब्बल 85 परिचारांची पदोन्नती करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने परिचारांना पदोन्नती मिळाली आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे आदी उपस्थित होते. परिचर संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष निलेश गाडेकर, सागर आगरकर, सचिन चितळे, ऋषिकेश बनकर, राहुल साळवे, अनिल येनगुल, भरत शेंडगे, दादा बरबडे, किरण खेडकर, चंद्रशेखर इरकर, विजय वाबळे आदी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले, शासन निर्णय 2025 मधील अधिसूचनेनुसार आज जिल्हा परिषदेमध्ये इतिहासात पहिल्यांदाच 89 पैकी 85 परिचर पदोन्नतीने आरोग्य सेवक झाले. चार जणांनी नकार दिला.ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक समुपदेशनाने पार पाडली. पदोन्नती झालेल्या सर्वांचे अभिनंदन. अहिल्यानगर जिल्ह्याची परंपरा सातत्याने पुढे राहण्याची आहे, ती या पदोन्नतीच्या माध्यमातून कायम ठेवली.

संघटनेचे अध्यक्ष निलेश गाडेकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात परिचर पदोन्नतीची प्रक्रिया अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच पार पडली, त्याबद्दल परिचर संघटनेच्या वतीने प्रशासनाचे आभार. त्यांनी सर्व परिचर बांधवांचेही सहकार्याबद्दल आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles